आर्केओगिरी : एका परिपूर्णतेचा प्रवास
चित्रकला कौशल्याच्या सुमार दर्जामुळे तयार झालेली पोकळी पुरातत्त्वीय पुराव्याशी १०० टक्के इमान राखून असलेल्या समर्पक, नेमक्या कॅप्शन्सनी भरून काढली. आणि या भांडवलावर मी माझे पहिले कार्टून फेसबुकवर टाकले! पुरातत्त्वज्ञांना हा approach अगदी नवीन होता. त्यांच्यात हास्याचे फवारे फुटले आणि आणखी हवे अशी मागणी होऊ लागली. ‘गांधीगिरी’च्या धर्तीवर ‘आर्केओगिरी’ हे नाव फेसबुकवर खुल्या मतदानातून सार्वमताने निवडले.......